भुदरगड मध्ये कोरोनाचे थैमान दोघांचे बळी पुष्पनगर येथील एकाच कुटूंबातील 17 जण पॉझिटिव्ह....

 


गारगोटी दि.१/ऑगस्ट/२०२०


स्वतंत्र प्रतिनिधी : दशरथ कांबळे । भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम भुदरगड कोल्हापूर ।


 


भुदरगड मध्ये कोरोनाच्या विषाणूचा विळखा वाढत आहे.पुष्पनगर गावात एकाच कुटूंबातील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.हे दोघेही सेवानिवृत्त होते.यांच्या संपर्कातील 77 जणांना आज कॉरनटाईन करण्यात आल्याने भुदरगड तालुका हादरला आहे.या सर्वाचे स्वब घेण्यात आले आहेत.यामुळे आसपासची गावे भीतीच्या वातावरणात आहेत.गारगोटी शहरापासून हे गाव चार किलोमीटर अंतरावर आहे.गावामधील एका गल्लीत गेल्या चार दिवसांपासून सरद्दी ,खोकला याचा त्रास जाणवू लागला होता .चार जणांना उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले होते.त्यातील तिघांचा श्वसनाचा त्रास होत होता .त्यापैकी काल दुपारी दोघांचा मृत्यू झाला .गावाच्या सर्व सीमा सील केल्या असून गावात सर्वत्र शांतता आहे.गाव भीतीचे छायेखाली आहे.