स्वतंत्र प्रतिनिधी : अविनाश उंदरे पाटील । भूमिरक्षक न्यूज नेटवर्क पुणे जिल्हा ।
पुणे : मांजरी खुर्द ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सौ.मनीषा रघुनाथ उंदरे पाटील यांची बिनविरोध निवड झाली.सरपंच निवडणूकित उंदरे यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
तत्कालीन सरपंच सौ.प्रतिमा सचिन उंदरे पाटील यांनी राजीनामा दिल्यानं ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या निवडणूक मध्ये सौ.उंदरे यांचा एकमेव अर्ज आला होता.
अधिकारी बी.व्ही.शेडगे यांनी उंदरे यांची बिनविरोध निवड घोषित केली. मांजरी खुर्द गावा मध्ये गुलालाली उधळण करत जल्लोष साजरा झाला.सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तलाठी आर.पी.कांबळे,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कदम यांनी काम पाहिले.या वेळेस श्री.रोहिदास उंदरे पाटील,विकास शेठ उंदरे पाटील ,स्वप्नील उंदरे,रघुनाथ उंदरे,बाळासाहेब भोसले,माऊली उंदरे,गौतम भोसले,वर्षा धर्मेंद्र मोरे,हिरामण गवळी व इतर मान्यवर यांनी सौ.मनीषा उंदरे पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाल साठी शुभेच्छा दिल्या.
हवेली- मांजरी खुर्द सरपंच पदी सौ.मनीषा उंदरे पाटील विराजमान.....
• Jayesh Sutar