प्रतिनिधी : जयेश@एकनाथ बी.सुतार
भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम मुंबई अंधेरी ।
दि.०६/१२/२०२०.
मुंबई : मुंबई महानगर पालिकेने मुंबई मध्ये स्वछ मुंबई प्रबोधन अभियान म्हणून एक नवीन संकल्पना २० वर्षा पासून राबवण्यात येत आहे. या माध्यमातून अनेक कामगारांना काम दिले जाते. महानगरपालिका सहा महिन्यातून एकदा विविध संस्था तर्फे निविदा घेऊन लॉटरी पद्धतीने सोडत काढली जाते असे महानगरपालिकेचे म्हणणे आहे.
ही संकल्पना चांगली असून यांमुळे अनेक लोकांना काम मिळते परंतु या संकलनेत अनेक तफावत आहे असे अखिल भारतीय श्रमिक एकता युनियन चे म्हणणे आहे. तसेच सदर युनियन च्या म्हणण्या नुसार या प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांवर अत्याचार होत आहे. सहा महिन्यात सदर निविदाची मुदत संपते व कामगार बेरोजगार होतात त्याना पुन्हा नवीन काम शोधावे लागते असे गेल्या २० वर्षा पासून चालू आहे. तसेच नियमानुसार कामगारांचा पगार थेट कामगारांच्या खात्यात पाठवण्या ऐवजी संस्थानांच्या खात्या मध्ये पाठवले जाते व कामगारांना संस्था मनमानी करून रोख रक्कम देते याचा कोणताही रेकॉर्ड ठेवला जात नाही.
या सर्व कारणांमुळे अखिल भारतीय श्रमिक एकता युनियन च्या वतीने कामगारांसाठी मुंबई महानगरपालिकेकडे मागण्या करण्यात आल्या आहेत व यासाठी विविध स्तरावर पत्र व्यवहार करण्यात आला आहे.
अखिल भारतीय श्रमिक एकता युनियन च्या मागण्या खलील प्रमाणे:
१) सफाई कामगारांना कायमस्वरूपी करून घेण्यात यावे.
२) सफाई कामगारांना लवकरात लवकर वेतन वाढ करून देण्यात यावी.
३) सफाई कामगारांची नियमानुसार प्रत्येक वॉर्ड संख्या असावी.
४) महानगर पालिकेने कामगारांचे वेतन थेट कामगारांच्या खात्यात वर्ग करावे.
५) सफाई कामगार याना P. F, E.S. I च्या सुविधा सुविधा देण्यात याव्या.
या सर्व मागण्या अखिल भारतीय श्रमिक एकता युनियन चे संस्थापक अध्यक्ष मोहन आर.देवेंद्र यांच्या वतीने करण्यात आल्या.
या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होण्या साठी स्वतः मोहन आर. देवेंद्र यांनी त्यांच्या टीम सोबत महानगर पालिकेच्या विविध कार्यालयांना भेटी दिल्या.त्यांचा सोबत अब्दुल रज्जाक बोले मुंबई सचिव, कमला गुप्ता महिला राष्ट्रीय उपाध्यक्ष, कृष्णा बशीरे सदस्य, दिनेश कदम सदस्य, सेलवसन कवंडर सदस्य,भूमी रक्षक मुख्य संपादक जयेश@एकनाथ बी. सुतार ( सल्लागार अखिल भारतीय श्रमिक एकता युनियन) हे सर्व उपस्थिती होते.