हाळोली श्री. चाळोबा देवस्थान महापूजा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न...



स्वतंत्र प्रतिनिधी : प्रकाश सुतार ( छायाचित्रकार) ।भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम कोल्हापूर ।

कोल्हापूर : ता.आजरा, चाळोबा ग्रुप हाळोली च्या वतीने आजरा तालुक्याच्या पंचक्रोशीतील 84 खेड्यांचे श्रद्धास्थान असलेल्या हाळोली  पासून चार किलोमीटर डोंगरात उंच टेकडीवर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले श्री चौरस 

 चाळोबा देवस्थान.

हाळोली गावचे  भूमी पुत्र(श्री चाळोबा ग्रुप हाळोली)  ग्रुपने चार महिन्यापूर्वी दुरुस्ती  केल्यानंतर रविवार दिनांक 6 12 2020 रोजी पंचक्रोशीतील हजारो भाविकांच्या उपस्थितीत चाळोबा डोंगरावर महापूजेचे आयोजन करण्यात आले होते .

 हजारो भाविकांनी डोंगरांमध्ये महाप्रसादाचा लाभ घेतेवेळी प्रत्येकाच्या तोंडात चाळोबा ग्रुपच्या  तरुणांचे कौतुक होते. कारण गावातील कार्यक्रमात भोजनाचे आयोजन केले तरी ते कोलमडते पण रस्त्यापासून आत 3 ते 4 किलोमीटर डोंगरामध्ये इतके जेवणाचे साहित्य पूजेचे साहित्य सर्व काही वस्तू त्या ठिकाणी घेऊन जाणे व भाविकांना सदर महाप्रसाद व्यवस्थित रित्या पुरवणे हे काम चाळोबा देवाचे आशीर्वाद त्याने सर्वांच्या मध्ये निर्माण केलेली ऊर्जा व ग्रुपचा एकजूट,  मेहनत यामुळे हे सर्व शक्य झाले यावेळी देखील आर्थिक पाठबळा  बरोबर श्रमिक पाठबळ महत्वाचे राहिले. महाप्रसाद यामध्ये भात, आमटी, भाजी ,खीर कुर्मा ,पापड इत्यादीचा समावेश होता. जवळपास आजूबाजूच्या खेड्यांमधून १८०० भाविकांनी इतिहासात प्रथमच  रांगा लावून चाळोबा चे दर्शन घेतले *ना भूतो ना भविष्य* अशीच काहीशी कल्पना काल होती.आज पर्यंत कित्येक यात्रा झाल्या 

 असतील पण अशी यात्रा जी झाली त्या कार्याची सगळ्यात मोठी आठवण ठेवून गेली यापुढे भविष्यात चाळोबा  ग्रुपच्या वतीने देवस्थान परिसरात वेगवेगळी कामे करत राहून भाविकांचा ओघ अविरत चालू राहील याची दक्षता घेत आहोत चाळोबा  ग्रुप हाळोलीचे काम बघून तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील लोकांनी प्रत्यक्षात  व सोशल मीडियाद्वारे कौतुक केले आहे यामुळे या ग्रुप मध्ये नवीन कामाची ऊर्जा निर्माण झाली आहे.