प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे ।
भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम पुणे ।
दि.०७/१२/२०२०.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमदार रोहित दादा पवार फॅन्स क्लब - महाराष्ट्र राज्य., यांच्या संयुक्त विद्यमानाने भारत देशाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित दादा पवार फॅन्स क्लब , महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून आज दिनांक ०६डिसेंबर २०२० रोजी मांगडेवाडी ते गुजर निंबाळकर वाडी कात्रज हायवे, पुणे. या परिसरात स्वच्छता मोहीम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ह्या वेळी श्रमदान करण्यासाठी आमदार रोहित दादा पवार फॅन्स क्लब - महाराष्ट्र राज्य संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. गुरव ● श्री. श्रीकांत देशमुख (पुणे जिल्हा अध्यक्ष) ● श्री. सागर लकेरी (पुणे शहर अध्यक्ष) ● श्री. अजित साबळे (पुणे शहर सरचिटणीस) ●
त्याचप्रमाणे ओमकार गाढवे , आयुष घाडगे , आकाश शिंदे , पवन साळुंखे , श्रवण गुरव , अभिषेक इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
यांच्या माध्यमातून या परिसरातील तब्बल चार गाड्या भरून कचरा गोळा करण्यात आला.
या उपक्रमासाठी मांगडेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच माननीय आबासाहेब मांगडे ह्यांनी ग्रामपंचायत ची कचरा गाडी व इतर साहित्य उपलब्ध करून दिले. यांचे या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले.
तसेच माननीय श्री. अजित ना. निंबाळकर (मा. उपसरपंच | विद्यमान सदस्य., ग्रामपंचायत गुजर-निंबाळकरवाडी) यांची मदत मिळाली व त्यानी या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष भेट दिली...
मांगडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार रोहित दादा पवार फॅन्स क्लब, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.