मुंबई प्रतिनिधी : जयेश @एकनाथ बा. सुतार ।
भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम मुंबई ।
दिनांक : ११/१२/२०२०.
मुंबई : अंधेरी येथील यशोभारत टाइम्स चे कार्यकारी संपादक तसेच महाराष्ट्र न्युज 9 चे संपादक नागेश कळस गौंडे यांनी काही दिवसापासून आपल्या लेखणीने तसेच आपल्या फेसबुक लाईव्ह किंवा आपल्या चैनल च्या माध्यमातून भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उचलण्याचा सपाटा लावला आहे. ते अंधेरी के पश्चिम महानगर पालिकेचा भोंगळा कारभार उघड करण्याचा प्रयत्न निर्भीड निःपक्षपातीपणे करत आहेत याची कुणकुण ही महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना लागली आहे व त्यांच्यात भीतीचे वातावरण ही निर्माण झाले आहे. असाच प्रयत्न ते आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून अंधेरी के पश्चिम महानगर पालिकेच्या बाहेर आपल्या फेसबुक लाइव्ह च्या माध्यमातून करत असताना तेथे महानगरपालिकेचे सुरक्षा कर्मचारी येऊन त्यांचा मोबाईल कॅमेऱ्याला हात लावून बंद करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार म्हणजे लोकतंत्राचा गळा दाबण्याचा प्रयत्न म्हटले तर वावगे होणार नाही.लोकतंत्राचा चौथा स्तंभ मीडिया म्हणजेच पत्रकारांना समजले जाते यांच्याशीच अशी वागणूक सदर सुरक्षा कर्मी करत असतील तर सामान्य जनतेशी हे कशे वागत असतील याची कल्पना आपल्याला आलीच असेल अशा कर्मचाऱ्यांनवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम अशा महानगर पालिकेच्या कर्मठ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा तसेच त्यांनी केलेल्या कृत्याचा जाहीर निषेध करते.