अंधेरी पश्चिम शिवसेना शाखा क्र.६७ तर्फे मतदार नोंदणी अभियान व नोकर भरती अभियान संपन्न ......

प्रतिनिधी : जयेश@एकनाथ बी.सुतार
भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम मुंबई अंधेरी ।
दि.०६/१२/२०२०.

मुंबई : अंधेरी येथील शिवसेना विधान सभे मधील वॉर्ड क्रमांक ६७ तर्फे मोठ्या संख्येने शितलादेवी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात स्थानिक बेरोजगार नागरिकांना नोकरी मिळवुन देण्या करिता नोकरी भरती अभियान राबवण्यात आले. यासाठी विभागातील नागरिकांना संपर्क साधून आपली माहिती नोंदवण्याची सूचना करण्यात आली.
यासोबत ज्या रहिवाशांचे नाव, नावाची दुरुस्ती ,फोटो अपडेट,करण्याचे काम ही मतदार नोंदणी अभियान अंतर्गत करण्यात आले या मोहिमेला अनेक रहिवाशांनी भेट देऊन उत्तम प्रतिसाद दिला.
या प्रसंगी संजय कदम अंधेरी विधानसभा संघटक , सुनील खाबिया अंधेरी विधानसभा समन्वय ,संजय पवार उपविभाग प्रमुख/ माजी नगर सेवक , दीपक सणस शाखा प्रमुख, संदीप खानविलकर कार्यालय प्रमुख, दीपक चव्हाण उपशाखा प्रमुख,सेलवन कावंडर ,संजय खराडे,जयवंत वाडेकर, वैभव जाधव गटप्रमुख, सौ.वलीमा पड्याची उप शाखा संघटक  इत्यादी मान्यवर  उपस्थित होते.