पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या भेटीचा अर्थ काय ? 


 


पुणे प्रसिद्धी प्रमुख-अविनाश उंदरे पाटील l


छायाचित्रे- चेतन कुंजीर ।


भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम पुणे ।


 


मोदींच्या सिरम इन्स्टिट्युटच्या भेटीकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. त्यांच्या या भेटीचे राजकीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून विविध अर्थ लावले जात आहेत.


सिरम इन्स्टिट्युट ही जगातील लस निर्मितीमधील एक महत्त्वाची संस्था आहे. कोविशिल्ड ही लस कमी किंमतीत आणि साठवणूक करण्यासाठी सोपी असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. ही लस 60 ते 70 टक्के परिणामकारक असल्याचे इंग्लंड आणि ब्राझिलमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमधून समोर आले होते. भारतातील चाचण्यांचे निकाल डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


 


भारतात कोव्हिडनंतर एक अनिश्चितता आहे. अर्थव्यवस्थेला सुद्धा मरगळ आल्याचे चित्र आहे. दिवाळीत काहीशी उभारी दिसली असली तरी ती पुढे कायम राहील असे दिसत नाही. त्यामुळे ही मरगळ, कोरोनामुळे आलेलं नैराश्य झटकायचं असेल तर लस लवकर येत आहे हा विश्वास लोकांना देणे गरजेचं आहे. त्यामुळे लोकांमध्ये धास्ती कमी होऊन काम करायला उभारी येईल. मोदींनी सिरमला भेट देणे म्हणजे कोरोनावरील लस आता आवाक्यात आली आहे अशी वातावरण निर्मिती करणे असे असू शकते.


 


"आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांच्या कंपन्यांमध्ये कोरोना लशीबाबत स्पर्धा दिसून येत आहे. पुढे ही स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. ऑक्सफर्डने म्हंटलय आमची लस स्वस्त आणि साध्या फ्रिजमध्ये ठेवता येते. जगभरातील अनेक देशांसाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे. सिरमची लस जगभर जाणार आहे. त्यामुळे यात भारतीय कंपनीचे ब्रॅंण्ड मार्केटिंगचा देखील मोदींचा असू शकतो.


 


"कोविशिल्डच्या लशीच्या परिणामकारकतेचे इंग्लंड आणि ब्राझीलमधील निकाल जाहीर करण्यात आले आहेत. भारतातील निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. भारतातील या लसीच्या परिणामकारकतेचे निकाल मोदींना सांगितले जातील असा तर्क सुद्धा या भेटीतून लावला जावू शकतो.


 


तसेच भारत हा लशीच्या निर्मितीला आणि वितरणाला सज्ज होतोय हे जगाला आणि देशाला लक्षात आणून देण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणतात.


 


लसीची तयारी कुठपर्यंत आली आहे हे पाहण्यासाठी मोदी सिरम इन्स्टिट्युटला भेट देत असावेत. त्या अनुषंगाने 26 जानेवारीला लशीबाबत काही घोषणा करता येईल का? या दृष्टीने देखील मोदींची चाचपणी सुरु आहे. खरंतर अशी भेट मोदींनी किंवा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी यापूर्वी द्यायला हवी होती."


 


"आशियामध्ये सिरम इन्स्टिट्युट ही एकमेव कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणात संशोधन आणि लशीची निर्मिती करत आहे. मोदी हे नेहमी स्वतः लीड घेऊन मार्केटिंग करतात. मोदी जगाला भारतातील सिरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक या दोन संस्थांची उदाहरणे देऊन भारताचे मार्केटिंग जगात करु पाहत आहेत," 


 


सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या दाव्यानुसार, दर महिन्याला 50 ते 60 दशलक्ष लशीचे डोस तयार करण्याच्या स्थितीत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत 100 दशलक्ष लशीचे डोस दर महिन्याला तयार होऊ शकतील असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. सीरम इन्स्टियूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी सरकारने जुलै 2021 पर्यंत 100 दशलक्ष लशीच्या डोसची मागणी केल्याचं सांगितलं. जुलै 2021 पर्यंत केंद्र सरकारने 300 दशलक्ष लशीचे डोस जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला आहे.