प्रतिनिधी : मुंबई ।
भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम मुंबई ।
जुहू पोलिस ठाणे हद्दीत दि. 11/11/2020 रोजी महिला वय २३ वर्ष रा.ठी. गोखले ब्रीज फूटपाथ अंधेरी पश्चिम मुंबई येथे तिचे दोन मुलासह झोपली असताना रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे चार महिन्यांचे बाळ चोरून नेल्याबाबत फिर्याद दिली म्हणून जुहू पोलिस ठाणे येथे गु र क्र ३७७/२० कलम ३६३ भादवी अन्वये नोंद केला.
सदर गुन्हाचे स्वरूप अतिशय गंभीर असल्याने व तो रात्रीच्या अंधारात घडल्याने आरोपीचा शोध घेणे अतिशय अव्हणात्मक होते. सदर गुन्हा उघड करून अपहरण झालेले बाळाचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्टानी दिल्या होत्या. जुहू पोलिस ठाणे चे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक बिरादार, तोडकर पोऊनी भोसले, मिरगणे
पो ह ठाकूर, तोडणकर पोना यादव, वलेकर, पाटील व पो शि सुहास भोसले यांनी सदर गुन्ह्याचे अरोपिबाबत कोणताही पुरावा नसताना घटनास्थळाची पाहणी करून सतत चार दिवस जुहू व अंधेरी परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे पाहून अथक प्रयत्न करून आरोपी बाबत माहिती प्राप्त करून खाजगी बातमीदार यांचे मदतीने आरोपीचा शोध घेतला असता खालील आरोपीने कट रचून अपहरण केलेल्या बाळास नालगोंडा तेलंगणा राज्य येथे चार लाखात विकल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर तत्काळ सपोनी बिरादार मपोऊनी मिरगने व पथकाने नालगोंदा राज्य तेलंगणा येथे जाऊन बाळाची खरेदी विक्री करणारा डॉक्टर यास ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांची मदत घेऊन अपहरण झालेल्या बाळास सारूनगर हैदराबाद येथून एका जोडप्याचे ताब्यातून सुखरूप सुटका केली. सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी यांना अटक केली आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरीसाठी * *मा.मुंबई पोलीस आयुक्त श्री.परम बीर सिंह सो. व* *मा. पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील **सो** यांनी
जुहू पोलीस ठाणे अधिकारी /अमलदार
यांना त्यांच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले