पुणे प्रसिद्धी प्रमुख-अविनाश उंदरे पाटील l
छायाचित्रे- चेतन कुंजीर ।
भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम पुणे ।
सुशिल सुधिर दुधाणे लिखित व नाविन्य प्रकाशन यांनी प्रकाशीत केलेले ' 'सह्याद्रीतील गड-दुर्गांची भटकंती ' या पुस्तकाचे काही मोजक्याच मान्यवरांच्या हस्ते ऑनलाइन प्रकाशन सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाला. करोना या महामारीच्या पादुर्भाव चे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी आणि सामजिक जबाबदारी चे भान ठेवुन या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या सोहळ्यास मा.श्री.पांडूरंग बलकवडे सर ( जेष्ठ इतिहास संशोधक), मा.प्रा.श्री.प्र.के.घाणेकर सर ( दुर्ग अभ्यासक), मा.श्री.सचिन जोशी
(इतिहास संशोधक व लेखक)
यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा ११ नोवेंबर २०२० वार बुधवार सायं.५ वाजता भारत इतिहास संशोधक मंडळ येथे संपन्न झाला. सोहळ्याचे सुत्रसंचालन मा.श्री.राहुल (रायबा) नलावडे (शिव व्याख्याते) यांनी केले.तसेच या सोहळ्यास श्री.डॉ.अजय इंगळे, श्री.आप्पा जगताप, श्री.राजेंद्र धुमाळ, श्री.श्रीरंग राहिंज यांची उपस्थिती लाभली.
या पुस्तकाला मा.श्री.पांडूरंग बलकवडे सर ( जेष्ठ इतिहास संशोधक),
आणि मा.प्रा.श्री.प्र.के.घाणेकर सर ( दुर्ग अभ्यासक) यांची प्रस्तावना लाभली आहे.
इतिहास संशोधक व लेखक मा.श्री.सचिन जोशी सर या पुस्तका विषयी सांगतात,
आधुनीक तंत्रज्ञानाचा वापर करून सुशिल दुधाणे सरांनी गड दुर्गांची भटकंती केली आहे.भटकंती अनेक ठिकाणी केली जाते , अनेक लोकांना भटकंती आवडते , परंतू त्यातून लिखाण करुन पुस्तक लिहिने हे एक कष्टाचे काम असते , आणि त्यांनी ते योग्य रितीने केले आहे.
दुर्ग अभ्यासक मा.श्री.प्र.के.घाणेकर सरांनी या पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणतात,उत्तम प्रकाशचित्र , शास्त्रीय दृष्ट्या अचुक माहिती व ट्रेकर्स मंडळींना मार्गदर्शक होइल असे हे पुस्तक आहे.
जेष्ठ इतिहास संशोधक मा.श्री.पांडूरंग बलकवडे सर आपले मनोगत व्यक्त करित असताना असे म्हणतात,
छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडकोटांच्या सहाय्याने हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्यांचे रक्षण केले.प्रत्येक गड-कोटांना एक दैदीप्यमान इतिहास आहे , ही आमचे प्रेरणा स्थाने आहेत.