बांगूर नगर पोलिसांचे उत्तम कर्तव्य लेखकाचे गहाळ झालेले २ लाख रुपये व इतर मुद्देमाल केला परत....


स्वतंत्र प्रतिनिधी : गणेश नावघरे ।


भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम मुंबई ।


 


मुंबई गोरेगाव:    मुंबई पोलीस म्हटलं चोक कामगिरी असेसएकूणच समीकरण आहे. याचे अनेक दाखले देता येतील. रोजच पोलिसांकडून चांगली कामगिरी केली जाते. याचा प्रत्यय बांगुर नगर पोलिसांमुळे आला. प्रवासादरम्यान गहाळ झालेले एका लेखकाचे २ लाख रुपये व इतर वस्तू असा एकूण २ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज बांगुर नगर पोलिसांनी परत केला.*


    मिळालेल्या माहितीनुसार, लेखक श्री अनिस मोहम्मद रईस खान (४०) हे २७ नोव्हेंबर रोजी रिक्षाने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांची बॅग रिक्षात राहिली. बॅगेबाबत लक्षात येईपर्यंत रिक्षाचालक निघून गेला होता. खान हे तात्काळ बांगुर नगर पोलीस ठाण्यात आले. त्यांनी घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. पोलिसांनी मिसिंग वस्तूंची रजि.क्र. 1120/2020 नुसार नोंद केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंजकर व त्यांच्या पथकाने तात्काळ रिक्षाचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. ज्या परिसरात खान रिक्षातून उतरले तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले आणि पोलिसांनी रिक्षाचा क्रमांक मिळवला. त्यानुसार एमएच-03-बीवाय- 2971 या क्रमांकाच्या रिक्षाचालकाचा शोध घेऊन पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली.*


     *लेखक श्री अनिस मोहम्मद रईस खान यांना पोलीस ठाण्यात बोलावून लेदर बॅग व बॅगेतील वापरत्या वस्तू, प्रयागराज स्टोरी स्क्रिप्ट, रोख रक्कम रुपये 2 लाख रुपये असा एकूण रुपये 2 लाख 17 हजार रुपयांच्या मुद्देमालाची पडताळणी करून प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती भोपळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंजकर व तपासी पोलीस पथकाच्या हस्ते सदर मुद्देमाल परत करण्यात आला.*


    *या उत्तम कार्याबद्दल बांगुर नगर पोलिसांचे मनापासून कौतुक ! प्रवासादरम्यान आपल्या वस्तूंची, बॅगांची काळजी घ्या. सर्तक रहा, सुरक्षित रहाल!*