सारथी संस्थेच्या स्वायत्तता कायम ठेवण्याच्या पाठपुराव्याबद्दल केले अभिनंदन
कोल्हापूर/कागल दि.१८
स्वतंत्र प्रतिनिधी:दशरथ कांबळे
भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम कोल्हापूर ।
सारथी संस्थेच्या स्वायत्त वरून मराठा समाज प्रचंड अस्वस्थ बनला होता. ही स्वायत्तता कायम ठेवण्याच्या मागणीसाठी मराठा समाजाने आंदोलनेही केली होती. कारण, महाविकास आघाडी सरकारने सारथी संस्थेची स्वायत्तता कायम ठेवावी.अशी सकल मराठा समाजाची आग्रही मागणी होती. सारथी संस्थेला महाराष्ट्र राज्य शासनाने पुन्हा स्वायतत्ता दिल्याबद्दल व पाठपुरावाबद्दल नामदार हसन मुश्रीफसाहेब यांचे सकल मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व आभार मानण्यात आले.
यावेळी सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी मा. वसंतराव मुळीक, मा. इंद्रजित सावंत, मा. दिलीप देसाई,मा. ॲड. गुलाबराव घोरपडे , मा. अवधूत पाटील, मा. प्रताप ऊर्फ भैय्या माने, मा. प्रकाश गाडेकर शाहिर राजू सांळूखे आदी प्रमुख मान्यवर.