नवी मुंबई दि.२८
स्वतंत्र प्रतिनिधी: दशरथ कांबळे ।
भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम मुंबई ।
आदरणीय खा.शरद पवार साहेबांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'जनता दरबार' उपक्रमांतर्गत आज आरोग्यमंत्री मा.ना.राजेशभैय्या टोपे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. भेटीसाठी आलेल्या नागरिकांनी त्यांचे आरोग्याविषयक प्रश्न मा.ना.राजेशभैय्या टोपे साहेब यांच्या पुढे मांडले. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.याप्रसंगी आ. शशिकांत शिंदे, आ. इंद्रनील नाईक, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, डॉक्टर सेल प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आणि मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे उपस्थित होते.