पुणे प्रसिद्धी प्रमुख-अविनाश उंदरे पाटील l
छायाचित्रे- सुकेशीन बनसोडे ।
भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम पुणे ।
वंचित बहुजन आघाडी प्रणित वंचित ऊसतोड कामगार संघटना व वंचित बहुजन आघाडी पुणे शहर यांच्या वतीने ऊसतोड कामगार संघटनेचे नेते मा. शिवराज बांगर व वंचितचे पुणे शहर अध्यक्ष मुनव्वर कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्युट मांजरी या ठिकाणी उसतोड कामगारांच्या प्रश्नावर आंदोलन करण्यात आले.उसतोड कामगारांच्या प्रश्नाबाबतच्या पंचवार्षिक ठरावाबाबतची मिटिंगमध्ये वंचित आघाडीच्या प्रतिनीधिला उपस्थित राहुन त्यांचे प्रश्न मांडण्याची संधी द्यावी अशी संघटनेची मागणी होती.परंतु वरिल मागणी मान्य न झाल्याने कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित नेत्यांच्या गाड्या अडवुन आंदोलन केले.त्यावेळी पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने ऊसतोड कामगार संघटनेचे नेते प्रा.शिवराज बांगर वंचित आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष मुनव्वर कुरेशी यांच्यासह कार्यकारी अध्यक्ष प्रफुल गुजर पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष गुलाबराव पाणपाटील ,प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड
संदीप वने,प्रशांत बोराडे, जयपाल सुकाळे व असंख्य पदाधिकाऱ्यांना हडपसर पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेण्यात आले.
सदर आंदोलनामध्ये प्रा.शिवराज बांगर, वंचित आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष मुनव्वर कुरेशी,उपाध्यक्ष प्रविण गायकवाड व रामदास सोंडकर, महासचिव जितेंद्र जाधव आणि महेश कांबळे, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल गुजर,सह-संघटक सतीश रणावरे,प्रवक्ते गौरव जाधव,सदस्य मयुर शिंदे,,सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शुभम चव्हाण, पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष गुलाबराव पाणपाटील ,प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड,
हडपसर विधानसभेचे पितांबर धिवार,श्रीधर जाधव,विनोद शिंदे,फरहान शेख, वडगावशेरी विधानसभेचे विवेक लोंढे,संदीप वने सम्यक विद्यार्थी आंदोलन नांदेड जिल्हाध्यक्ष,प्रशांत बोराडे राज्य सचिव सम्यक विद्यार्थी आंदोलन, जयपाल सुकाळे,संजु कांबळे ,फयाझ सय्यद ,सुकेशीनी बनसोडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
- जितेंद्र जाधव
महेश कांबळे
महासचिव पुणे शहर
वंचित बहुजन आघाडी