भूदरगड प्रतिष्ठानच्या वतीने सैनिक भवन येथे फेसशिल्ड वाटप...


 


प्रतिनिधी:-भुदरगड, कोल्हापूर ।


भूमिरक्षक न्युस नेटवर्क ।


 


  कोल्हापुर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुदरगड प्रतिष्ठनाच्या वतीने सैनिक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात सैनिक बँकेचे मॅनेजर किरण भोईटे यांच्या नेतृत्वाखाली फेसशील्ड‌ व मास्कचे वाटप करण्यात आले


   या कार्यक्रमात सैनिक बँक, एस टी बँक ,व बिरेश्वर बँकेचा सर्व स्टाफ उपस्थित होता. गेल्या काही वर्षात भुदरगड प्रतिष्ठानने  अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असून आता बँकेतील कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचाव होण्यासाठी फेसशील्ड व मास्क देऊन एक उपक्रम राबविण्यात आला.


     कार्यक्रमाच्या वेळी डाॅक्टर बेलेकर मॅडम यांचे हस्ते फेसशील्ड व मास्कचे वाटप करणेत आले.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद भोईटे व त्यांच्या टिमचे सामाजिक उपक्रमाचे कौतुक करणेत आले आणि भुदरगड प्रतिष्ठानच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.