पुरंदर- शिवधर्म फाउंडेशन  वतीने संभाजी बिडी विरोधात आमरण उपोषण..


 


पुणेप्रसिद्धी प्रमुख-अविनाश उंदरे पाटील l


छायाचित्रे- चेतन कुंजीर ।


भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम पुणे ।


 


शिवधर्म फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य च्या वतीने संभाजी बिडी या उत्पादनचा नावावर आक्षेप घेण्यात आला आहे.हे नाव श्रीमंत छत्रपती धर्मवीर संभाजीराजे भोसले महाराज यांचे असून तमाम देशातील शिवभक्त प्रेमींनी या नावास विरोध दर्शवत आमरण उपोषण बसले आहे.


शिवधर्म फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य चा बिडी उत्पादन याला विरोध नसुन नावाला विरोध दर्शविला आहे.तसेच शिवधर्म फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य ला समर्थन देत शिवभक्त वाघाची टोळी , महाराष्ट्र राज्य व हिंदु साम्राज्य महासंघ तसेच सर्व शिवशंभु भक्त यांनी पाठिंबा देत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.


शिवधर्म फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्रतील जिल्ह्यातून शुक्रवारी दि.०४ सप्टेंबर,२०२० पासून जो पर्यंत नाव बदलत नाही तोपर्यंत आमरण उपोषण बसणार आहे असा इशारा दिला आहे.


तसे पत्र श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना पाठवले आणि राजेंनी शिवधर्म फाउंडेशन यांना पाठिंबा दर्शवत  शिवप्रेमी ना  पाठिंबा दर्शीवला आहे ।