कोल्हापूर प्रसिद्धी प्रमुख-अमर जाधव l
भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम कोल्हापूर ।
कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह च्या घोळमध्ये एका ३५ वर्षीय महिलेचे बाळंतपण माहेर दवाखान्याच्या बाहेर झाले.डॉक्टर बी.एफ.गॉडद यांनी रिस्क घेत बाळंतपण केले.
चिंचेवाडी (ता.गडहिंग्लज) येथील सासर व आजरा तालुक्यातील साळगाव येथील माहेर असलेल्या एका महिलेला बाळंतपणासाठी सकाळी गडहिंग्लज येथे नेण्यात आले मात्र तेथील एकाही दवाखान्यात कोरोना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली नाही.कुटूंबाने नेसरी (ता.गडहिंग्लज) येथे नेले तेथेही घेतले नाही.शेवटी आजरा शहरातील माहेर हॉस्पिटल मध्ये आणले.या दवाखान्यात आणल्यानंतर कोरोना संदर्भात चौकशी केली कुटुंबाने गडहिंग्लज येथे दिलेल्या रिपोर्ट मध्ये ही महिला निगेटिव्ह होती मात्र हा कागद फाडला असल्याने गडहिंग्लज येथे दवाखान्यात चौकशी केली असता ती पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले गेले.
ते कुटुंब दवाखान्याच्या पायरीवर बसून होते.डॉ.बी.एफ.गॉडद व डॉ.बी.बी.गॉडद शस्त्रक्रिया करत होते.महिलेचे हाल बघून मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर कोरवी यांनी डॉक्टरांना फोनव्दारे परिस्थिती सांगितल्याने डॉ. गॉडद तातडीने बाहेर आले.पॉझिटिव्ह निगेटिव्ह चा प्रकार स्टाफनी सांगितला मात्र डॉ गॉडद यांनी त्याकडे दुर्लक्ष करत बाळंतपण जवळ आलेल्या महिलेला तपासणी करत असतानाच ती बाळंत झाली.तातडीने महिलेच्या भोवती कापडी स्टँड उभा केले. बाहेरच तीला सलाईन लावले.बाळ, आई सुखरुप होते मात्र महिलेला पुढील उपचारासाठी गडहिंग्लज पाठवायचे होते.कोरवी यांनी रुग्णवाहिका बोलावून पाठवले.