आजरा तालुक्यात रस्त्यावर महिलेची प्रस्तुती बाबत संबंधित डॉ. व  अधिकाऱ्यांनची चौकशी करून निलंबित करण्याची शिवसेनेची मागणी....


 


प्रतिनिधी : ता. आजरा, कोल्हापूर ।


भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम कोल्हापूर ।


 


कोल्हापूर : चिंचेवाडी (ता.गडहिंग्लज) येथील सासर व आजरा तालुक्यातील साळगाव येथील माहेर असलेल्या एका महिलेला बाळंतपणासाठी सकाळी गडहिंग्लज येथे नेण्यात आले मात्र तेथील एकाही दवाखान्यात कोरोना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली नाही.कुटूंबाने नेसरी (ता.गडहिंग्लज) येथे नेले तेथेही घेतले नाही.शेवटी आजरा शहरातील माहेर हॉस्पिटल मध्ये आणले.या दवाखान्यात आणल्यानंतर कोरोना संदर्भात चौकशी केली कुटुंबाने गडहिंग्लज येथे दिलेल्या रिपोर्ट मध्ये ही महिला निगेटिव्ह होती मात्र हा कागद फाडला असल्याने गडहिंग्लज येथे दवाखान्यात चौकशी केली असता ती पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले गेले.


या सर्व पॉझिटिव्ह निगेटिव्ह च्या घोळमध्ये सदर महिलेची प्रस्तुती  हॉस्पिटलच्या दारात झाली ही बाब आजरा तालुक्या मधील शिसेनेचे जिल्हा उपसंघटक संभाजी पाटील व त्यांचे कार्यकर्ते  यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर प्रकरणाचा निषेध करत या प्रकरणाची चौकशी करून जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी पत्राद्वारे आजरा तहसीलदार  यांच्या कडे करण्यात आली.


या वेळी शिवसेनेचे उपसंघटक संभाजी पाटील यांच्या सोबत कार्यकर्ते उपस्थित होते.