भुदरगड दि.७
स्वतंत्र प्रतिनिधी : दशरथ कांबळे l
भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम कोल्हापूर ।
कोरोना संसर्गाचा वाढता वेग पाहता गारगोटी शहर बुधवार दि 9 सप्टेंबर पासून 22 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यु म्हणून 14 दिवस बंद करण्याचा निर्णय गारगोटी व्यापारी संघटना आणि ग्रामपंचायत गारगोटी यांच्या वतीने नुकताच घेण्यात आला.
यामध्ये सर्व व्यवहार कामकाज कडक बंद करीत हा बंद काळजीपूर्वक पाळण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
अत्यावश्यक सेवेमध्ये दूध विक्री आणि मेडिकलसाठी सकाळी 3 तास आणि सायंकाळी 3 तास सुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या काळात सर्वांनी घरी राहून कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी म्हणून हा बंद यशस्वी करण्यास सहकार्य करावे
असे सांगण्यात आले .