भुदरगड दि.७
स्वतंत्र प्रतिनिधी : दशरथ कांबळे l
भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम कोल्हापूर ।
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नातू राईद नविद मुश्रीफ याने अवघ्या सहा वर्षाच्या वयात WhiteHat Jr live online coding for kids ऑनलाईन शिक्षण प्रणालीत त्यांनी गेम डेव्हलपमेंट करून प्रथम आल्याबद्दल vibgyorhigh school शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राईद नवीद मुश्रीफ यांचे कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
राईद नवीद मुश्रीफ यांने
डब्ल्यू व्हाइटहॅट जूनियर मॉरल लाइव्ह ऑनलाइन कोडिंग फॉर किड्स सर्टिफाईड गेम डेव्हलपर ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गूगल, इंटेल,डिस्कवरी माजी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या स्पर्धेत अवघ्या सहा वर्षाच्या वयात मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून एवढ्या लहान वयात गेम डेव्हलपमेंट करून कागल तालुक्याच्या भूमिपुत्राचे सर्वत्र नाव लौकिक मिळवलेला आहे.