भुदरगड दि.08
स्वतंत्र प्रतिनिधी : प्रकाश सुतार l
भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम कोल्हापूर ।
माजी उपसभापती दिनकरराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी 09 सप्टेंबर रोजी तिरवडे ( ता. भुदरगड) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या करोना या महामारी च्या काळात वाढदिवसाच्या कार्यक्रमाला डिजिटल बॉर्ड,हार तुरे , बुके असा अवाढव्य खर्च न करता दिनकरराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व तिरवडे ग्रामस्थांना इम्युनिटी बूस्टर चे वाटप असा समाज उपयोगी कार्यक्रम ठरवण्यात आला असून जास्त जास्त दात्यांनी रक्त दान करून सहकार्य करावे असे आवाहन वाढदिवस उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
या वेळी उपसरपंच विश्वजित जाधव, युवराज पाटील, सचिन पाटील , सुधीर ठाकूर, संतोष तळकर , प्रकाश गोजारे, प्रवीण गुजर, एकनाथ वरंडेकर, दिलीप गुजर, नंदकुमार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.