राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष मेंगाणे.....


गारगोटी दि.१२


स्वतंत्र प्रतिनिधी:दशरथ कांबळे 


भूमिरक्षक न्युज नेटवर्क कोल्हापूर ।


 


     राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निळपण ता भुदरगड चे सुपुत्र संतोष सर्जेराव मेंगाणे यांची निवड झाली.गेले अनेक वर्षे माजी आमदार के पी पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध पदावरून अत्यंत सक्षमपणे ते वाटचाल करत आले आहेत. या पक्षाची अनेक पदे भुषवत मोठे समाजकार्य ते करत आले आहेत.उत्तम संघटन कौशल्य, समृध्द वाणी, समाजासाठी सतत देत असलेले योगदान यामूळे ते तालुक्याला परिचित आहेत. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचे चांगले काम ते करत आले आहेत. पक्षाच्या सर्वच निवडनुकात ते सक्रिय असतात अशा सक्षम कार्यकर्त्याल राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्याने निश्चीतच पक्षाची ताकद वाढेल असा विश्वास त्यांचे नेते ऱाधानगरी भुदरगड चे माजी आमदार के पी पाटील यांनी व्यक्त केला आहे. यापुढील काळात या पदावरून पदवीधरांच्या समस्या सोडवून त्यांची उंन्नती साधण्यासाठी आपणा सर्वांचे पाठबळ द्या. आपणास या विभागात भरीव कामगिरी करायची आहे  असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला आहे.


   या नियुक्तीकामी नामदार हसनसो मुश्रीफ,  या संघटनेचे न  प्रदेशाध्यक्ष सुनिल पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष के पी पाटील,  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे व तमाम हितचिंतकांचे सहकार्य लाभलेचे जिल्हाध्यक्ष संतोष मेंगाणे यांनी सांगितले.