पुणे प्रसिद्धी प्रमुख-अविनाश उंदरे पाटील l
छायाचित्रे- प्रा. अमिता कदम ।
भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम पुणे ।
कोविड 19 रुग्णांना मदत करण्यासाठी स्पिरिचुअल सोशल अँड चॅरिटेबल फाउंडेशन आणि नोबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर येथील बंटर हायस्कुल मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची संधी आम्हाला मिळाली,
या शिबिराचे उदघाटन आपल्या विभागाचे जनतेचे आमदार मा. चेतनजी तुपे साहेब यांनी केले.
यावेळी नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेवक योगेश ससाणे, उज्वला जंगले, डॉ.शंतनू जगदाळे, नोबलचे कार्यकारी संचालक एच.के.साळे, डॉ.सिद्धराम राऊत, विजय मोरे, प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, सतीश जगताप, राजेंद्र सपकाळ, शोएब इनामदार आदी उपस्थित होते.
पुणे शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच असून रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशावेळी स्पिरीचुअल सोशल अँड चॅरिटेबल फाऊंडेशनने केलेल्या ह्या उपक्रमात रक्तदात्यांनी सहभाग घेऊन या सामाजिक एकतेचे दर्शन घडवून दिले आहे.
या देशकार्यात सहभागी झालेल्या व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेऊन मदत केलेल्या सर्वांना माझ्या वतीने मानाचा सलाम.
रक्तदान शिबिराचे आयोजन एस.एस.सी.एफचे राष्ट्रीय महासचिव अनिल मोरे, पुणे विभाग प्रमुख डॉ.नामदेव पाटील, स्वतः मी हडपसर विभाग प्रमुख रोहिणी भोसले आदींनी केले होते.