पुणे - हडपसर परिसरात माणूसकी चे दर्शन......


प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे पाटील 


छायाचित्र : अशोक आव्हाळे ।


भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम पुणे।


 


गेले  तीन चार  महिन्यापासून  लाॅकडाऊन  मध्ये  मायलेकी अडकल्या होत्या, हडपसर गाडीतळ उड्डाणपूलाखाली बसस्टाॅप मध्ये साधारण तीस वर्षाची महिला (राधिका शिंदे) आणि तिच्या सोबत असलेली एक पाच  वर्षाची मुलगी (नंदिनी शिंदे) करोना मुळे गाड्या चालू नसल्याने हड़पसर बस स्टॉप  येथे अडकून पडल्याने शिवाय पैसा पैसे नसल्याने तेथेच भीक मागून रस्त्यावर राहून  कसाबसा आपला गुजारा करत होती.  त्या लातूर हूँन आल्या होत्या.. 


 


पुन्हा जेव्हा लाक्डाउन पडले म्हणजे गेली दहा पंधरा दिवसापासून लहान चिमुरडीची  आई आजारी पडली,  कोणी दवाखान्यात न्यायला तयार नव्हते.. दिवस-रात्र झोपून होती तेव्हा त्या पाच वर्षांच्या चिमुरडीने आपल्या  आईची काळजी घेतली.  तिला खाऊ घातले.  परंतु वरचेवर आईची तब्यत ढासळत चालली होती. 


 


आज  जेव्हा मला बेधडक महाराष्ट्र न्यूज चॅनलवरून  ही गोष्ट कळाली की, गाडीतळ येथे जाऊन त्या महिलेची विचारपूस करून  ॲम्बुलन्स बोलावून  महिलेस नेऊन ससून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आले.  यावेळी  डॉक्टर श्री रोहित बोरकर, दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार श्री वसंत वाघमारे, पत्रकार, श्री यशवंत बनसोडे, सौ नूतन पळसकर यांची मदत झाली..


 


स्मिता गायकवाड


स्मितसेवा फ़ाउंडेशनप