पापर्डे बुद्रुकचा गणेशोत्सव एक आदर्श......

 


 


स्वतंत्र प्रतिनिधी: चेतन कुंजीर ।


माहीती :कृष्णकांत गणपत देसाई. विभाग - पुणे - सातारा l भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम पुणे कोल्हापूर मुंबई ल


छायाचित्र - अनिल वसंत देसाई l


      एक गाव एक गणपती या संकल्पने बरोबरच पापर्डे बुद्रुक ता.पाटण गावान सर्वांनपुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे .गावामध्ये फक्त एकाच ठिकाणी श्री.गणेशाची स्थापना करण्यात येते.नवचैतन्य गणेश तरूण मंडळ पापर्डे बुद्रुक असे एकमेव मंडळ गावात आहे. व याच ठिकाणी मोठ्ठया उत्साहाने सर्व अबाल - वृद्ध , महिला - पुरुष  सहभागी होतात. पापर्डे बुद्रुक मधील बहुतांश लोक पुणे , मुंबई येथे वास्तव्यास असतात. माञ श्री गणेशाच्या स्थापनेसाठी सर्वच लोक आपल्या गावी अगदी न चूकता येतात. त्यामुळे धार्मिक , सामाजिक, एकतेचा नवीन आदर्श असा गाव पहायला मिळतो.      


     छ.शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पाटण तालुक्यातील डोंगर रांगांच्या व निसर्गाने नटलेल्या कोयनेच्या मायेत वसलेले पापर्डे बुद्रुक हे गाव.ज्या दिवशी श्री गणेशाची स्थापना करावयाची आहे त्याच्या अगोदर गावातील स्वच्छता केली जाते.  विशेष म्हणचे श्री गणेशाला आणण्यासाठी सर्व स्ञिया एकाच रंगाची साडी व युवक - पुरुष वारकरी पेहराव करतात. श्री गणेशाला आणण्याच्या दिवशी पायी दिंडीचे आयोजन केले जाते . 


      कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व जातीधर्मांचे लोक एकञ येऊन पापर्डे बुद्रुकच्या राजाला आणण्यासाठी उत्साहाने सामिल होतात. बेंजो किंवा डीजे न लावता सामाजिक व शासकीस नियमांचा आदर ठेवून टाळ व मृदंग यांच्या तालावर श्री गणेशाच्या गीतावर गव्हाणवाडी ते पापर्डे असा सुमारे ४-५ कि.मी प्रवास पायी दिंडी सोहळा असतो . पापर्डे बुद्रुक येथे आगमन झाल्यानंतर मोठे रिंगण व अश्वांचे रिंगण पार पडते. 


      वाचे बोलावी ज्ञानेश्वरी !! डोळा पहावी पंढरी !! साक्षात पंढरी अवतरल्याचे दृश्य पहायला मिळते. गणेशोत्सव काळात भजन - कीर्तन , सामाजीक शैक्षणिक विद्यार्थांसाठी व्याख्यान , शैक्षणिक वर्षात उज्वल यश मिळवल्यामुळे सन्मान व प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित करतात. महिलांसाठी खास होम मिनिस्टर व गौरीपूजन खेळ ठेवण्यात येतात. असा हा दुर्मिळ पण आदर्श घेण्यासारखा सोहळा पाहण्यासाठी शेजारील गावातील लोकही मोठया संख्येने  उपस्थिती दर्शवितात. पापर्डे बुद्रुक येथील एक गाव एक गणपती या उपक्रमाची संपूर्ण कराड व पाटण तालुक्यात चर्चा असते . अनेक गावात गट- तट असतात पण इथे माञ अख्खा गाव एकवटून आपल्या श्री गणेशाला उत्साहात आणतात. रोज पुजा, आरती होणारे कार्यक्रम यांची सर्वञ चर्चा  ऐकायला मिळते. त्यामुळे शासन स्तरावर या गावची दखल घेवून या गावाचा योग्य सत्कार करत नवचैतन्य गणेश तरूण मंडळ पापर्डे बुद्रुक या मंडळाचा  आदर्श गणेश मंडळ म्हणून गेल्या वर्षी जिल्हा स्तरीय सन्मान करण्यात आला होता. 


    *परंतु , या वर्षी कोरोणा च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे , सरकारी नियमांचे भान ठेवत , प्रशासनाला सहकार्य करत   मास्क , सनिटायझर आणि सोशल distancing याचे  काटेकोर पालन करत, गतवर्षीचे सर्व कार्यक्रम रद्द केले गेले आहेत व  गणेशोत्सव साजरा केला जात आहे* 


   तसेच गावामध्ये एक गाव एक गणपती असल्यामुळे आरती म्हणण्यासाठी दररोज फक्त १० घरामधील एका एका सदस्यांना येण्यास सांगितले जाते जेणेकरून गर्दी होवू नये . सर्वजण गणारायचारणी एकाच प्रार्थना करत आहेत की हे कोरोणा चे संकट लवकर जावो ...