स्वतंत्र प्रतिनिधी-चेतन कुंजीर ।
भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम पुणे ।
पुणे : बाळासाहेब ठाकरे वृक्षदान योजना पुणे जिल्ह्यातील ही अनोखी योजना शिवसेना हवेली तालुका माजी संघटक श्री स्वप्नील कुंजीर पाटिल यांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे.जिल्ह्यातील कुठल्याही गणपती मंडळाने गणेश विसर्जन दिवशी पर्यावरण पूरक लिंब,वड,चिंच उसे वृक्ष लावावे ते वृक्ष श्री कुंजीर यांच्या वतीने मोफत दिले जाईल व त्यांची नोंद करून घेतली जाईल.गणपती मंडळाने सदर झाड़ लावलेल्या ठिकाणीचा फोटो काढून सम्पूर्ण माहिती सादर करावी त्यांची नोंद ठेवली जाईल.पुढील वर्षी २०२१ च्या गणेशोत्सवा पर्यंत ते वृक्ष चांगले जोपासले गेले तर ज्या मंडळांचे वृक्ष उत्तम जोपासले जाईल अशी तीन बक्षिसे प्रथम, द्वितीय व तृतीय देऊन मंडळास गौरवचिन्ह व रोख परितोषक देऊन सन्मानित करण्यात येईल याने वृक्षदान ही होईल व गणेश मंडळांसाठी एक निसर्ग पूरक स्पर्धाही होईल असे श्री स्वप्नील कुंजीर पाटील यांनी सांगितले.या स्पर्धेमुळे निसर्ग संवर्धन होईल तसेच तरुण मंडळाना पारितोषिक देऊन गौरविले तर नक्कीच एक प्रकारे झाडांची जोपसना करण्याची स्पर्धा जोर धरेल याने न कळत स्वच्छ सुंदर पर्यावरणास चालना मिळेल असे मत निसर्गप्रेमींनी व्यक्त केले.