राधानगरी पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या सौ.सुशिला शामराव भावके (काकी) यांची निवड....

 


 


भुदरगड दि.२८


स्वतंत्र प्रतिनिधी:-दशरथ कांबळे ।


भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम कोल्हापूर ।


 


कोल्हापुर : राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधीपासून राधानगरी पंचायत समितीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत. महाविकास आघाडीमधून यावेळी सौ.सुशिला भावके यांची निवड करण्यात आली असून पहिल्यांदाच राधानगरी पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख नेतेमंडळींचे आभार.


 


यावेळी शिवसेना आमदार प्रकाश अबिटकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील साहेब, भोगावती कारखाना संचालक जेष्ठ नेते किशाबापू किरुळकर, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले साहेब, गोकूळ संचालक पी.डी.धुंदरे साहेब, संजयसिंह पाटील-तारळेकर, रविश पाटील-कौलवकर, माजी सभापती दिपाली पाटील, उपसभापती मोहन पाटील, विश्वनाथजी तहसीलदार, बाळासो भावके साहेब, पंचायत समिती सदस्या सविता हळदे, सोनाली पाटील, सुभाषजी पाटील-मालवेकर, कसबा वाळवे सरपंच अशोक फराकटे, विजयराव बलुगडे, अशोकजी वारके, डी.पी.पाटील सर, बबन देवर्डेकर, राजू वाडेकर, दादासो पाटील चंद्रे, विलास पाटील, कृष्णात पाटील, बापूसो किल्लेदार, रंजना आंबेकर, सुषमा पाटील, अरविंद पाटील, कसबा वाळवेचे युवा नेते दादासो पाटील, ॲड.प्रशांत भावके यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.