पुणे- आंबेगाव ब्रु- आंबेगाव मधील रस्त्याची दुरवस्था.....

 


 


पुणे प्रसिद्धी प्रमुख-अविनाश उंदरे पाटील l


छायाचित्रे- चेतन कुंजीर ।


भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम पुणे ।


 


आंबेगाव ब्रु नुकत्याच पडलेल्या पावसामुळे रस्त्यात भरपूर ठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे. आंबेगाव ब्रु पालिका समावेशानंतर येथील नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिक वेळोवेळी प्रशासन ला समस्या सोडवण्यासाठी मागणी करत आहे.


शंभूरत्न ब्रिगेड अध्यक्ष प्रमोद शिवाजीराव घुले पाटील  येथील नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे.वेळोवेळी प्रशासनला समस्या सोडवण्यासाठी मागणी करत आहे.ग्रामपंचायत ते अभिनव कॉलेज रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी त्या पालिकेने जास्तीत जास्त निधी मंजूर करून  या भागातील प्रश्न लवकरात लवकर सोडावा अशी मागणी नागरिक व शंभूरत्न ब्रिगेड करत आहेत.