पाटगाव ,शिवडाव दि.१७
स्वतंत्र प्रतिनिधी:- सुरेश कांबळे ।
भूमिरक्षक न्युस नेटवर्क ।
कॉन्टकेअर आय हॉस्पीटल, कोल्हापूर यांच्या वतीने मोफत नेत्रचिकित्सा शिबीराचे आयोजन भुदरगड तालुक्यातील मौजे शिवडाव ,सम्राट अशोक नगर येते भरवण्यात आले.
शिबीराचे आयोजन करत असताना कोरोना महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व नियमाचे पालन करून सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर ,अनावश्यक गर्दी टाळणे ,सोशल डिस्टन्सिंग इत्यादी चे पालन करून डोळे तपासण्यात आले .तसेच शासनाने वेळोवेळी निसर्गमित सूचनांचे काटेकोरपणे पालन करून शिबीराचे नियोजन करण्यात केले गेले .यावेळी शिवडाव सम्राट अशोक नगर मधील नागरिकांची उपस्थिती व चांगलाच प्रतिसाद मिळाला.कॉन्टकेअर आय हॉस्पीटलचे डॉक्टर भालेकर व पुजारी,शिवडाव गावचे ग्रामसेवक चव्हाण ,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कांबळे,भुदरगड सोशल मिडीया अध्यक्ष सौरभ कांबळे , अविनाश कांबळे मयूर कांबळे ,अनिकेत कांबळे ,रुपेश कांबळे ,सचिन कांबळे,रवींद्र कांबळे,शरद कांबळे व गावचे नागरिक इत्यादीचे सहकार्य लाभले.