लोणी काळभोर येथील पोलिस स्टेशनचे पोलीस कामटे यांच्या वर कारवाई महाराष्ट्र धनगर समाजाची मागणी...

पुणे प्रसिद्धी प्रमुख-अविनाश उंदरे पाटील l


माहिती संकलन- शंकर आबा घुले ।


भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम पुणे ।


 


पुणे : लोणी काळभोर येथील पोलिस स्टेशनचे पोलीस कामटे साहेब यांनी हॉटेलचालक धायगुडे यांच्याकडे महिना पाच हजार रुपये हप्ता देण्याकरता मागणी केली असता गेली चार महिन्यापासून यांच्या काळात सुद्धा हॉटेलचालक धायगुडे यांनी प्रत्येकी दहा तारखेला न चुकता हप्ता देऊन सुद्धा पोलीस कामठे साहेब यांनी काल 10 ऑगस्ट रोजी एक तास लेट दिल्यामुळे हॉटेल चालक धायगुडे यांना शिवीगाळ करून फोनवरती त्यांना धमकी दिली व हा विषय  महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष बाबाराजे कोळेकर यांच्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग किल्प आले असता त्यांनी हा विषय लक्षात घेऊन तात्काळ पोलीस कामटे साहेब यांना फोन करून चौकशी केली असता साहेबांनी माझे चुकले असे सांगून घटनेवर ती पडदा टाकण्याचे काम केले परंतु बाबाराजे कोळेकर यांनी घटनेची दखल घेऊन पुणे एसपी माननीय संदीप पाटील साहेब तसेच लोणी पोलीस स्टेशनचे सुरज बंडगर साहेब यांच्या कडे जाऊन हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवला आहे जर या गुन्ह्याचा तपास नाही झाला तर महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळ राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे करून हॉटेल चालक धायगुडे यांना न्याय मिळवून द्यायचे आश्वासन देण्यात आले आहे.