राधानगरी, ता.राधानगरी येथे संस्थान काळात पोलीस यंत्रणा अस्तित्वात आली....


स्वतंत्र प्रतिनिधी : दशरथ कांबळे । भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम भुदरगड कोल्हापूर ।

संस्थान कालीन जुन्या चार खोल्यात पोलीस ठाणे कार्यरत होते. अत्यंत गैरसोयीच्या व अपुऱ्या जागेतील ठाण्यातून कारभार करणे जिकरीचे बनले होते. यामुळे राधानगरी येथे नवीन पोलीस ठाण्याची इमारत होणे गरजेचे होते. यामुळे मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. सदर पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम अंतीम टप्यात असून त्यांची पहाणी केली.

यावेळी यावेळी आमदार प्रकाश अबिटकर जि.प.चे मा.अर्थ व शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, तालुका प्रमुख उत्तम पाटील, भिकाजी हळदकर, राधानगरी सरपंच कविता दीपक शेट्टी, प्रशांत भावके, सचिन पालकर, मिथुन पारकर, अरविंद पाटील, तहसीलदार मीना निंबाळकर, पोलीस निरीक्षक उदय डूबल, वैद्यकीय अधीक्षक डॉ.गवळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेटे, सहाय्यक गट विलास अधिकारी श्री.शिंदे, उपअभियंता अमित पाटील, पं.स.उपअभियंता श्री.खैरे, भाऊ टिपूगडे, एम.डी.चौगले, एम. के.पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.