प्रतिनिधी : भूमिरक्षक नुज नेटवर्क टीम मुम्बई.
मुंबई शिव-सायन : देशाच्या अनेक भागात मध्ये विविध क्षेत्रात अनेक मोलमजुर काम करतात उदा.ट्रान्सपोर्ट मधील कामगार ,घर काम करणाऱ्या महिला,चित्रपतसेने मधील कामगार, कलाकार , तसेच संघटीत व असंघटीत कामगार इ. कामगार आपले काम प्रामाणिक पणे करत असतानाही त्यांना त्यांचा कामाचा मोबदला काही कंपन्यांन कडून दिला जात नाही तसेच त्यांच्याकडून पगारा पेक्षा जास्त वेळ काम करून घेतले जाते आशा अनेक समस्या कामगारांन समोर येत असतात याचाच विचार करून श्री .मोहन पी.आर. देवेंद्र व त्यांच्या पदाधिकारी यांनी विचार केला आणि मोल मजुरांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी 2017 साली अखिल भारतीय श्रमिक एकता युनियनची स्थापना केली या स्थापणे नंतर तीन वर्षे उलटून गेल्या नंतर सर्वांच्या मनात विचार आला व कोर कमिटी च्या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक नेमण्याचे ठरवले व सर्वांनी एकमताने मा.रामदासजी आठवले ( केंद्रीय मंत्री )यांचे नाव सुचवून मा.रामदासजी आठवले ( केंद्रीय मंत्री) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला व त्यांनी या प्रस्तावाला मान ठेवत प्रमुख मार्गदर्शक बनण्याचे ठरवल्यानंतर अखिल भारतीय श्रमिक एकता युनियन यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी रामदास आठवले (केंद्रीय मंत्री) यांच्या निवास स्थानी जावून शाल, श्रीफळ व त्यांना पत्र देऊन त्यांचा आशिर्वाद घेण्यात आला.
या प्रसंगी युनियनचे संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्ष श्री.मोहनपी.आर.देवेंद्र , संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शेखर सुब्रमनिअम, संघटनेचे प्रदेश सचिव श्री.परेश जी शिंदे, संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.जावेद जी पठाण, संघटनेचे सल्लागार श्री.मधू जी रणदिवे तसेच संघटनेचे घरकाम महिला मुंबई उपाध्यक्षा अंकिता जी शिंदे , भूमिरक्षक या वृत्तपत्राचे मुख्य संपादक जयेश@एकनाथ ब.सुतार आदि पदाधिकारी उपस्थित होते.