प्रतिनिधी : भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम पुणे।
प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे पाटील ।
छायाचित्र : चेतन कुंजीर ।
पुणे : मांजरी गावात दोन रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने ग्रामपंचायत ने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कार्यवाही करण्याचे ठरवले .दिवसेंदिवस कोरोना रोग वाढत असल्यामुळे मोकाट फिरणारे तसेच मास्क न लावता फिरणारे दिसतास त्यांच्यावर कार्यवाही केली जाणार आहे असे ग्रामपंचायत मांजरी खुर्द च्या वतीने सांगण्यात आले . जेणे करून संसर्ग साखळी तोडण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच काही लोक सांगून ऐकत नसल्या मुळे मांजरी गाव व पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून गावात जनता कर्फ्यु लागू करणार आहे असे सांगाण्यात आले.
ग्रामपंचायत वतीने ग्रामपंचायत कर्मचारी विठ्ठल सावंत तसेच रामभाऊ उंदरे व केविड 19 योध्दा कल्पेश थोरात यांनी दंड आकारण्याची कामे पाहत आहे.