मोकाट कुत्र्यांची उपासमार टाळण्यासाठी प्रयत्न - सौ. अमृत पठारे

 



 


प्रसिध्दी प्रमुख : अविनाश कदम ।स्वतंत्र प्रतिनिधी : अमित कदम । छायाचित्र : चेतन कुंजीर ।


भूमिरक्षक न्युस नेटवर्क पुणे ।


 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. त्यामुळे वडापाव, मिसळ पाव आणि काही हॉटेल्स सुरू झाली त्यामुळे मोकाट कुत्र्यांची उपासमार काहीअंशी कमी झाली होीत. मात्र, पुनश्च लॉकडाऊन केल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे मोकाट कुत्र्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना मागिल अनेक दिवसांपासून दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात बनून चपाती-भाकरी खाऊ घालण्याचे काम शिवसेनेच्या वडगावशेरी विधानसभा समन्यक, 


 पुणे जिल्हा शिवअंगणवाडी संघटिका अमृत पठारे करीत आहेत.


अमृत पठारे म्हणाल्या की, कचराकुंड्या आणि रस्त्याच्या कडेला वा सार्वजनिक ठिकाणी अनेक नागरिक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये शिल्लक राहिलेले अन्न टाकतात. ते खाण्यासाठी मोकाट कुत्र्यांची झुंबड उडते. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून खराडी परिसरातील रस्ते प्रमुख चौक ठिकाणी मोकाट कुत्री असतात, तेथे दररोज सकाळी त्यांना खाऊ घालण्याचे काम सुरू केले आहे, असे त्यांनी सांगितले.