सुरक्षा उपायांचा अंगीकार तरच कोरोना होईल हद्दपार....


 


प्रतिनिधी:  अविनाश उंदरे पाटील ।
भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम पुणे ।

               पुणे : प्रतिनिधी - घरात राहूनच द्याल साथ तेव्हाच कोरोना वर होईल मात. तसेच सुरक्षा कवच बनवू, कोरोनाला कायमचे पळवू.    या उक्ती प्रमाणे कोरोना व्हायरस च्या  वाढत्या संक्रमणामुळे सर्वांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सगळीकडे कोरोनाच्या वाढत्या  प्रादुर्भावावर कायमस्वरूपी ब्रेक लावून तो  रोखण्यासाठी सम्पूर्ण जगात आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.मात्र  अद्याप यावर औषध/लस उपलब्ध झाली नसल्याने त्याकामी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.  रोज वाढणारा आकडा सर्वांच्या जीवाचे ठोके वाढवणारा ठरत असल्याने सर्वानी घरातच राहून या जैविक विश्वयुध्दाला सामोरे जाण्याची नितांत आवशकता आहे. त्यासाठी सतत हात साबणाने धुवा, मास्क लावा, हस्तांदोलन टाळणे, एक मीटरचे सामाजिक अंतर सातत्याने राखणे, इत्यादी  बाबी आवर्जून पाळणे महत्वाचे आहे. त्याकरिता SHINDE  या नावातुन कोरोना चे संक्रमण रोकण्यासाठी घ्यावयाची खबरदारी व जनजागृती कु.समर्थ शिंदे, इयत्ता 4 थी , सेंट पँट्रिक्स स्कूल, पुणे याने त्याच्या कुशल बुद्धीने त्याच्या चित्रातुन साकारली आहे.  वास्तविक पाहता सर्वानी आवर्जून याचे पालन करावे, याकरिता कु.समर्थ याने हा जनसंदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. कु. समर्थ हा अँड.संतोष शिंदे यांचा मुलगा आहे.