वाढीव वीज बिले रद्द करा अन्यता महाराष्ट्र राज्य विधुत पुरवठा विभाग या कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा !


 


प्रतिनिधी: भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम शिवडाव पाटगाव ।


दि.०६/०७/२०२०.


कोल्हापूर पाटगाव  :विद्युत मंडळाच्या चुकीमुळे अवास्तव पणे आलेली वाढीव  वीजबिले रद्द करून दर महिन्याच्या सरासरी प्रमाणे वीज बिलाची आकारणी करावी अशी मागणी समाजसेवक दशरथ कांबळे यांनी केली असुन, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कडगाव या कार्यालयात जाऊन आंदोलन करू असे दशरथ कांबळे यांनी सांगितले.
     कोरोना संकटामुळे ग्रामीण भागातील सर्व नागरिक शेतकरी वर्ग आर्थीक अडचणीत आला असून सध्या पाटगाव व शिवडाव भागामध्ये  शेतकरी रोप लावणी सुरू असुन,
त्यातचं महावीतरण कडून एकदम 3 महीन्याचे बिल आकारणी करून वाढीव विज बिले दिले आहेत.हे विज बिल पाहता ग्राहकांना चांगलाच मनस्ताप झाला आहे.
तरी संपूर्ण लाॅकडाऊन काळातील विज बिले माफ करावीत दर महिन्याच्या रिडींग प्रमाने विज बिल आकारणी करावी .विज बिल न भरलेल्या ग्राहकांच्या लाईट कनेक्शन बंद करू नये अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
     तसेच संबंधित आधीकार्यांनी प्रत्येक गावात जाऊन शंकेचे निरसन करावे तरी वरील मागन्या मान्य व्हाव्यात.असा इशारा देण्यात आला असुन यावेळी
दशरथ कांबळे सह चंद्रकांत कांबळे , सौरभ कांबळे , सचिन कांबळे , उमेश कांबळे , व सर्व  ग्रामस्थ उपस्ती होते.