अंधेरी प्रभाग क्रमांक 67 मध्ये शिवसेने तर्फे वारकरी दिंडी मधील शिल्पनां पुष्पहार घालून आषाढी एकादशी चा कार्यक्रम संपन्न


प्रतिनिधी: भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम मुंबई अंधेरी ।

मुंबई अंधेरी : आषाडी एकादशीनिमित्त प्रभाग क्र ६७ मधील संत नामदेव महाराज चौकातील वाहतूक बेटावर शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा उपविभागप्रमुख व माजी नगरसेवक श्री संजय पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वारकरी दिंडी मधील वारकरी शिल्पांना,

विधानसभा संघटक श्री संजय कदम, समन्वयक श्री सुनील खाबिया यांच्या हस्ते पूजा करून पुष्पहार घालण्यात आले त्याप्रसंगी आयोजक श्री संजय पवार, शाखाप्रमुख श्री दीपक सणस, श्री गणपत जाधव, उपशाखाप्रमुख श्री राजू नेटके, श्री हर्ष पारीख, श्री दीपक चव्हाण, श्री शौनक नाचणे, गटप्रमुख श्री दीपक लीलांनी, श्री योगेश भार्गव, श्री संदीप खराडे, व श्री ज्ञानेश्वर खराडे, श्री नरेश सावंत उपस्थित होते.

२०१४ ला हे वाहतूक बेट बनविल्यापासून गेली सात वर्ष आषाढी व कार्तिकी एकादशीला पूजा केली जाते.