पालकमंत्री ना.राजेश टोपे यांच्या विशेष प्रयत्नातून माहे ऑक्टोंबर-नोव्हेबर 2019 मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसाने शेतीपिकाच्या नुकसानीपोटीचे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे जालना जिल्हयासाठीचे 31 कोटी 97 लाख 90 हजार रुपये अनुदान मंजूर-29 जून 2020 रोजीचा शासन निर्णय


प्रतिनिधी: भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम नवी मुंबई ।

जालना जिल्हायाचे  पालकमंत्री ना.राजेश टोपे यांच्या विशेष प्रयत्नातून माहे ऑक्टोंबर-नोव्हेबर 2019 मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसाने शेतीपिकाच्या नुकसानीपोटीचे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे जालना जिल्हयासाठीचे 31 कोटी 97 लाख 90 हजार रुपये अनुदान मंजूर झाले.

          माहे ऑक्टोंबर-नोव्हेंबर  2019 मध्ये चक्रीवादळाने झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान मोठया प्रमाणात झाले होते.शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हनून शासनाकडून शेतीपिकांसाठी प्रति हेक्टरी 8 हजार रुपये व बहुवार्षीक फळपिकांसाठी प्रति हेक्टरी 18 हजार रुपये अनुदान जाहिर करण्यात आले होते.सदरील अनुदानातून जालना जिल्हयातील काही गावे वंचित राहिली होती.जिल्हयाचे पालकमंत्री ना.राजेश टोपे यांनी मा.ना.विजय वडेटटीवार मंत्री मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन,बैठका घेऊन अनुदान मंजूर करुन घेतले.

          यामध्ये घनसावंगी तालुक्यातील 8 गावांचे फळपीक व जिरायत अनुदान 5 कोटी 11 लाख 81 हजार 445 रुपये आणि 32 गावांचे फळपीक अनुदान 2 कोटी 25 लाख येणे बाकी होते.पालकमंत्री ना.राजेश टोपे यांच्या सततच्या
पाठपुराव्याने जालना जिल्हयासाठी  31 कोटी 97 लाख 90 हजार रुपये अनुदान मंजूर झाले असून दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान होण्याची प्रक्रिया सुरु होईल व शेतकऱ्यांना अत्यंत गरजेच्या वेळी हे अनुदान मिळेल.
    पालकमंत्री ना.राजेश टोपे यांनी केलेल्या पाठपुराव्याने अनुदान मंजूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.