प्रतिनिधी : भूमिरक्षक न्युज नेटवर्क मुंबई ।
मुंबई :अंधेरी पश्चिम शितलादेवी येथील इंडियन ऑईल गॅप दरम्यान लिंक रोड वर रास्ता खचल्याने दिवसा रात्री येणाऱ्या दुचाकीस्वार पडून अपघात होत होते याला कंटाळून रहिवाशांनी वारंवार तक्रार दाखल करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही या खचलेल्या रस्त्या मुळे अपघात तर होत होते पण जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
या बाबत आम्हास स्थानिक रहिवाशांनी विनंती करत तक्रार दाखल करण्यात आली त्या अनुषंगाने भूमिरक्षक वृत्तपत्र व अखिल भारतीय श्रमिक एकता युनियन तर्फे बृहन्मुंबई म्हणगारपलिकेकडे तक्रार दाखल केली असता सदर तक्रारीची दखल घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेने 24 तासाच्या आत खचलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले सदर कामामुळे सर्व रहिवाश्यांनी भूमिरक्षक वृत्तपत्र, अखिल भारतीय श्रमिक एकता युनियन तसेच बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आभार व्यक्त केले.
छायाचित्र : विनायक र. कौंदर.