प्रतिनिधी : भूमिरक्षक न्युज नेटवर्क माणगाव ।
माणगांव कडापे :करोना महामारी च्या काळात पूर्ण विश्व त्रासलेले असतानाच चक्री वादळाचे संकट महाराष्ट्रावर आले या चक्री वादळाने महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान केले या वादळा मुले अनेक गावातील मोठ मोठे झाडे, मोबाईल टॉवर, घरांचे पत्रे,लाईट चे मोठं मोठे खांब, घरांच्या भिंती उदवस्त झाल्या व मोठ्या प्रमाणात शेतीचे पण नुकसान झाले अशाच प्रकारे माणगाव तालुक्यातील मधील कडापे गावा मधेही फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता पर्यंत सरकार कडून कोणतीही मदत गावातील गावकाराण्यांना देण्यात आलेली नाही. याच गावातील गावकरी अविनाश मढवी विभाग संघटक म.न.से. अंधेरी पश्चिम जे मुंबई मध्ये राहत असून ही बाब यांच्या लक्षात आली व त्यांनी आपले वरीष्ठ विभाग प्रमुख मनीष धूर व किशोर राणे यांच्या मार्ग दर्शनाखाली व आपली कार्यकर्ते यांच्या सोबत एक हात मदतीचा गावातील रहिवाशांना देण्याचा ठरविले त्यानंतर त्यांनी आपले सहकारी अमोल शेलार उप शाखा अध्यक्ष म.न.से., दिनेश सावंत गटप्रमुख म.न.से, शेखर सुब्रमणीअम सामाजिक कार्यकर्ते, तसेच भूमिरक्षक वृत्तपत्राचे मुख्य संपादक जयेश@एकनाथ बा.सुतार हे तात्काळ माणगाव तालुक्यातील कडापे गावी पोहचले व गावतील रहिवाशांना कडधान्य, तेल,साखर,मीठ,कांदे, बटाटे,तूर डाळ, वाटप करण्यात आले. सदर चा कार्यक्रम गावचे तरुण कार्यकर्ते, पोलीस अधिकारी तसेच गावचे ग्रामस्थ यांच्या उपस्थित संपन्न झाला. कारकायकर्माच्या अंती गावचे पोलिस पाटील यांनी सर्वांचे आभार माणून कार्यक्रम संपवण्यात आला त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त गावची पाहणी केली.