स्वतंत्र प्रतिनिधी : चेतन कुंजीर । भूमी रक्षक न्युज नेटवर्क पुणे।
पुणे : समाजासाठी आपण काहीतरी देणे लागत आहोत. त्यामुळे अविनाश उंदरे व त्यांचा सहकरी यांनी अनाथ आश्रम मध्ये वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. कोरोनाच्या संकट खूप मोठे आहे तरी सुद्धा सर्व नियम अटी पाळून अनाथ आश्रम मध्ये मुलांना भाजीपाला देऊ केला. माईंचा आदर्श पाहून सर्वांच्या मनात समाजसेवा करायची इच्छा होते. अविनाश त्याचे सहकारी व मित्रा मंडळी यांनी मिळून वाढदिवस साजरा न करता सिंधुताई सकपाळ अर्थात अनाथांची आई ( माई ) यांच्या आश्रम मध्ये मुलांसाठी भाजीपाला देऊ केला. निलेश बनकर,प्रशांत दरेकर ,अमोल घुले ,चेतन कुंजीर,शुभांगी ताई शिंदे ,फायझ सय्यद तसेच तेजस्विनी संस्थेचे संस्थापक राजकुमार काळभोर, शुभांगी काळभोर, संगीता काळभोर, अमृत पठारे, प्रा. विद्या होडे, प्रा. सुरेश वालेकर, मारुती काळभोर, रोहिणी जाधव ह्या मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला . अविनाश व त्यांचे सहकारी यांना या समाजकार्याने खूप आनंद झाला आहे व माईचा आशीर्वाद घेऊन असेच समाज कार्य करत राहण्याची त्यांनी शपथ घेतली आहे.