प्रतिनिधी : भूमीरक्षक न्युस नेटवर्क मुंबई।
मुंबई : अंधेरी पश्चिम नवरंग सिनेमा मागे साई बाबा मंदिराची पडझड झाली होती ही बाब मनसे पदाधिकारांच्या लक्षात येताच संबंधित मंडळांच्या पदाधिकारी यांच्याशी संगनमताने व अंधेरी पश्चिम चे मनसे विभाग प्रमुख मनीष धुरी तसेच उपाध्यक्ष किशोर विष्णू राणे यांच्या मार्गदर्शना खाली उपविभाग संघटक अविनाश मढवी यांनी मंदिराच्या डागडुगीचे काम केले. सदर मंदिराच्या कामा मुळे मंदीराचे अध्यक्ष वसंत पाटील तसेच पदाधिकारी सचिन आंग्रे , राकेश पाटील, सूर्यकांत पिंपलकर , श्रीकांत जाधव , रवी कोशिंमकर, रवी शिंदे यांनी मनसे च्या पदाधिकारी यांचे मनापासून आभार व्यक्त केले.