नवी मुंबई/प्रतिनिधी भूमिरक्षक न्युज नेटवर्क ।
पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेकडून संस्थेच्या २५५ सभासदांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, यामध्ये प्रत्येकी १५ कि.तांदूळ,१०कि. गहू, साखर ५ कि. ५ लि.तेल, ३ कि. तूरडाळ, चहा पावडर, मीठ असे एकंदरीत २०००₹ चे समान देण्यात आले.
या मदतीसाठी विशेष महत्वाचा हातभार जयश्री बापट यांनी ७५०००/- ₹ तसेच पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी २५०००₹ चे समान संस्थेला मदत म्हणून दिले आहे. याबद्दल संस्थेने त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
यावेळी सोशल डिस्टनसिंगचे पालन करून सर्वांना सामानाचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग हुमणे,सचिव बन्सीलाल तळेकर, खजिनदार किसन रौंधळ, कार्याध्यक्ष राजेश भगत, सभासद शरद घुले, संजय पोकळे, विजय हुमणे, सतिष अचार्य, बाळु गुंडले, अशोक पोकळे, राजेंद्र परदेशी, बाळाराम पाटील या सभासदांनी भरपुर मेहनत घेऊन हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांनी त्यांना धन्यवाद दिले.
पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेकडून संस्थेच्या २५५ सभासदांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...