मांजरी खुर्द ..कोरोना व्हायरसच्या लढाईत शेतकरी देखील बनला ‘कोरोना’ योद्धा....


प्रतिनिधी : अविनाश उंदरे पाटील । जिल्हा पुणे
सभासद : चेतन कुंजीर.


पुणे : शेती ,पिठाची गिरणी संभाळत कोरोनाच्या या लढाईत अशोक आव्हाळे  यांचा हिरीरीने सहभाग....
मांजरी,जगातील विविध देशांसह भारत देखील कोरोना विरुद्ध लढाईत उतरला आहे. उद्योगपतींपासून सामान्य व्यक्ती देखील आपापल्या परिने देशासाठी योगदान देत आहेत. महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यातही अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून कोरोनाची लढाई जिकण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्नशील आहेत.  हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द परिसरात देखील अशाच एका तरुण शेतकऱ्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा, तालुका आणि गावच्या आरोग्य तसेच पोलीस यंत्रणेला गावपातळीवर मदत करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. 
अशोक आव्हाळे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. शेतीत ऊस आणि टोमॅटो पिकांची देखभाल, गावात पिठाची चक्कीचा व्यवसाय हे दोन्ही संभाळून मिळेल त्यावेळेस गावात ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, रेशनिंग विभाग ,पोलीस , लोकप्रतिनिधी यांनी राबविलेल्या उपाययोजना यात स्वतः हिरीरीने सहभागी होवून अशोक आव्हाळे हे कोरोनाच्या लढाईत 'कोरोना' योध्दा म्हणून काम करत आहेत. औषध फवारणी, गावातील नाकेबंदी, आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत, डॉक्टर आपल्या दारी यात जागृती ,रेशनिंग वाटप येथे मदत तसेच पोलिसांनी उभारलेल्या चेक पोष्टवर थांबून सहकार्य अशी कामे अतिशय झोकून देऊन अशोक आव्हाळे पार पाडत आहेत. 
 


मोफत पाणी वाटपाचा उपक्रम



गावतील एकाच भागात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने याभागात काहींना क्वारंटाइन करण्यात आले आहे, तसेच या भागातील नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. अशा कुटुंबाना घरपोच शुद्ध पाणी स्वतः च्या खर्चाने  मोफत देण्याचा उपक्रम सर्व काळजी घेऊन राबविण्यात येत असल्याचे अशोक आव्हाळे यांचे म्हणने आहे.