मांजरी खुर्द - डॉक्टर आपल्या दारी ही संकल्पना गावात मोफत राबविण्यात आली....


प्रतिनिधी : अविनाश उंदरे । पुणे जिल्हा.
छायाचित्र : चेतन कुंजीर.


पुणे : मांजरी खुर्द येथे आज दि 7/5/2020 रोजी डॉक्टर आपल्या दारी अंतर्गत भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स, तसेच या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री सुनिल आण्णा टिंगरे व सुहासभाऊ टिंगरे  यांच्या माध्यमातून "  डॉक्टर आपल्या दारी  "  या संकल्पनेतून गावातील ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व लोकांना मोफत औषधे देण्यात आले. यामध्ये 80 लोकांची तपासणी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली. यावेळी डॉ प्रतिक्षा शेवाळे,  डॉ अश्विनी विरकर, यांनी तपासणी केली तसेच  चांद तांबोळी, पोलिस मित्र कल्पेश थोरात, सुनिल थोरात व हवेली तालुका पत्रकार संरक्षण समितीचे उपाध्यक्ष अशोकराव आव्हाळे यांनी सोशल डिसटनशिंगचा वापर करुन लोकांची आरोग्य तपासणी करुन घेतली. 
यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य केल्या बद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.