मांजरी खुर्द - डाॅ_स्वाती_प्रमोद_आंबेकर यांचा करोनाशी विजयी लढा ....


प्रतिनिधी : संदीप उंदरे। भूमिरक्षक न्यूज नेटवर्क।
छायाचित्र : अविनाश उंदरे पाटील ।
पुणे :  मांजरी येथे डाॅ_स्वाती_प्रमोद_आंबेकर याना आपकय कार्या दरम्यान व करोना योद्धा म्हणुन लढत असताना त्यांच्यावर हे संकट आल होत परंतु जबरदस्त_इच्छाशक्ती आणि प्रबळ_प्रतिकारशक्ती या दोन आयुधांनी त्यांनी विजश्री 
खेचून आणला त्यांचा गावाला सार्थ अभिमान आहे. त्यांची या महामारी मधुन सुटका झाल्यावर उत्साहात आगमण झाले   तेव्हा मांजरी खुर्द ग्रामस्थांनी त्यांच जल्लोषात स्वागत केल
    मांजरी खुर्द गावात त्यांचे फुलांचा वर्षाव करत  व टाळ्या वाजवून मांजरी खुर्द ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी माजी पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते, महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सोशल डिसटनशिंगचा वापर करुन ताईंचे स्वागत केले. 
या प्रसंगी अशोकराव आव्हाळे उपाध्यक्ष हवेली पत्रकार संरक्षण यांनी स्वागत साठी विशेष हातभार  लावला.