प्रतिनिधी : अविनाश उंदरे पाटील । पुणे जिल्हा ।
भूमिरक्षक न्युस नेटवर्क पुणे ।
कोरोना संसर्गा मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेक खाजगी रुग्णालयाकडून इतर आजारांच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाकडून मनमानी शुल्क आकारले जातात.त्यामुळे गरीब रूग्णांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.सरकारने आशा रुग्णालयांना शुल्क आकारणी बाबत नियम घालून त्याच्यावर नियंत्रण आणावे अशी मागणी ऍड. शुभांगी बनसोडे-शिंदे व ऍड. राहुल खरात यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री ट्विटर द्वारे निवेदन दिले आहे.जेणे करून गरीब वर्गाची आर्थिक पिळवणूक होणार नाही . ऍड. शिंदे म्हणतात सरकारने ही बाब गांभीर्याने घेऊन खाजगी रुग्णालयांना शुल्क आकारणी बाबत नियमावली लागू करण्याची गरज आहे .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे रोजगार हिरावले आहे आणि इतर आजार साठी खाजगी दवाखान्यात अधिक शुल्क आकारले जाते ही बाब खर गंभीर आहे.