भूमी रक्षक वृत्त पत्राने 5000 पेक्षा जास्त वाचक व 100 पेक्षा सभासदांनचा आकडा केला पार..... मनसे चे अंधेरी (प.) वॉर्ड क्र.६७ चे शाखा अध्यक्ष व कार्य करते ही सभासद झाल्या बद्दल हार्दीक स्वागत.....


प्रतिनिधी : अंधेरी पश्चिम  । मुंबई जिल्हा.


मुंबई । अंधेरी : भूमी रक्षक या वृत्त पत्राची स्थापना 2013 या वर्षी मुंबई मधून करण्यात आली. या वृत्त पत्रा द्वारे समाजाला काही चांगले देण्याचं आम्ही ठरवले या साठी आमी एकच मुद्दा न घेता साहित्य कला,क्रीडा,आरोग्य आणि मनोरंज सारख्या बातम्यांना जास्त भर दिला या वृत्त पत्रा द्वारे आम्ही तळागाळातील जनतेचा आवाज उचलण्याचा प्रयत्न केला व कर आहोत आमचा कोणत्याही पक्ष,संघटना,एन.जी.ओ व इतर कोणाशीही संबंध नाही तरीही जे पक्ष, संघटना, एन.जी.ओ समाजासाठी दिवस रात्र काम करतात त्यांचा प्रचार त्यांची सामाजिक कामे जनते समोर आणण्यासाठी आम्ही माघे पुढे हटत नाही मग तो कोणत्याही पक्षाचा ,जातीच, धर्माचा असो.
तसेच समाजात राहून जे काही समाजकंटक समजा विरुद्ध कट कारस्थान रचतात समजा विरुद्ध काम करतात पोलिसांन विरुद्ध काम करतात , अवैध धंदे चालवतात त्यांना आम्ही न घाबरता त्यांचा आमच्या वृत्त पत्रा द्वारे परदा फाश करत असतो.
  काही काळाने जनतेतू आम्हाला मिळालेल्या सूचनेनुसार आम्ही आमच्या वृत्तपत्राचे सभासद बनवण्याचे ठरवले जेणे करून आमच्या बातम्या , लेख जनतेच्या घरा घरात पोहचू शकतील व जनता जागृत राहील 
जनतेने आमची कार्य शैली पाहता आमच्या बरोबर विविध क्षेत्रातील लोक जोडू लागली व बघता बघता आम्ही 100 सभासदांचा पल्ला गाठला.
या मोहिमे मध्ये आमच्या बरोबर काही प्रतिष्ठित लोक ही जोडली गेली उदाहरणार्थ अंधेरी पश्चिम येथील वॉर्ड 67 चे मनसे चे शाखा अध्यक्ष अमोल प्रकाश शेलार व त्यांचे करकर्ते यांना ही आमची कार्य शैली पाहता ते आमच्या वृत्तपत्राचा सभासद बनण्या पासून रोखू शकले नाही.
जग भरात करोनाची महामारी चालू असताना आम्ही अनेक ठिकाणी फिरलो व वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांची सामाजिक कार्य पाहिले तसेच अंधेरी पश्चिम मधील वॉर्ड क्रमांक 67 मध्ये मनसे चे शाखा अध्यक्ष अमोल प्रकाश शेलार व त्यांच्या कार्यकर्ते करत असलेले दिवस रात्र परिश्रम पाहता आम्हालाही त्यांना आमच्या वृत्त पत्राचे सभासद बनवण्याचा मोह आवरता आला नाही.