पुणे... कुंजीरवाडी परिसरात 500 ते 600 लोकांना मोफत घरपोच मोठ्या प्रमाणात भाजी पाला वाटप....


प्रतिनिधी : चेतन कुंजीर । कुंजीर वाडी ।जिल्हा पुणे.


पुणे : संपूर्ण देशभरात करोना विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे.महाराष्ट्रात पुणे शहरालाही करोनाचा मोठा फटका बसला आहे..
यावेळी शहरात काही भागात लोकांचे काम धंदे बंद झाले आहेत.. खेड्यापाड्यात पण लोकांना कामे नाहीत.. त्या मुळे काही भागात लोकांनकडून रोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला वाटप करण्यात येत आहे .


"कोरोना"मुळे लॉक डाऊन असल्याने लोकांचे हाल होऊ नये म्हणुन हवेली शिवसेना माजी तालुका संघटक श्री स्वप्निल शेठ कुंजीर पाटील यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री निवस्थानावरुन परिसरातील सुमारे 500 ते 600 लोकांना पुरेल येवढा भाजीपाला गेले महिनाभर अगदी मोफत घरपोच वाटप करण्यात येतो. श्री स्वप्निल शेठ कुंजीर पाटील  मित्र परिवार यांच्या वतीने घर पोच मोफत भाजीपाला वाटप करण्यात आला यात गवार,टॉमेटो,भेंडी,कांदा पात,बटाटा,व कांदा असा भाजीपाला वाटण्यात आला.