लाॅकडाऊनच्या काळात क्रृपया अन्न धान्य व पैसे जपून खर्च करा...


जिल्हा: पुणे.


आपण ही वेळ रोज नव्या डिश करुन अन्न वाया घालवायची नाही.आज वस्तुंचा पुरवठा होतोय, उद्या असलेच याची शाश्वती नाही.जेवढे गरजेचं आहे तेवढं रांधा, वाढा, पण हौशीने रोज नवे प्रकार करुन उधळपट्टी टाळा.
भसाभस किराणा घेऊन संपवू नका. जे आहे त्यात, थोडक्यात भागवण्याचे हे दिवस आहेत.
संकट संपलं तरी ही महागाई काही काबूत येईल की नाही देव जाणे.
पुढील दिवस अवघड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगभरात पुरवठा कमी पडतोय.
आज रांगा लावून मिळतंय ते उद्या असेलचअसं नाही.उत्पादन/शेती करायला मनुष्यबळ मिळेल याची शाश्वती नाही.पाणी, वीज, अन्न सर्व जपून वापरा.लॉक डाऊनचे दूरगामी परिणाम होणार आहेत.सावध आणि सजग व्हा.. ही बराच काळ चालणारी लढाई आहे,जीभेवर व खर्चांवर नियंत्रण ठेवा कोणाकोणाच्या नोकर्‍या व कामधंदे जातील व रहातील याची शाश्वती नाही.


पुढील दिवस अवघड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगभरात पुरवठा कमी पडतोय.
आज रांगा लावून मिळतंय ते उद्या असेलचअसं नाही.उत्पादन/शेती करायला मनुष्यबळ मिळेल याची शाश्वती नाही.पाणी, वीज, अन्न सर्व जपून वापरा.लॉक डाऊनचे दूरगामी परिणाम होणार आहेत.सावध आणि सजग व्हा.. ही बराच काळ चालणारी लढाई आहे,


बेजबाबदारपणे वागून स्वतः सह आपले कुटुंब आपला समाज व देशाला खड्ड्यात घालू नका ।।


लेख : स्वप्निल कुंजीर पाटील 
             सामाजिक कार्यकर्त